'कोंबडी पळाली' चं हिंदी रिमेक 'चिकनी चमेली', आपल्या बेफाट नृत्य-अदाकारीने प्रसिद्ध करणारी बॉलिवूडची टॉपची नायिका कॅटरििना कैफ सुद्धा कोरोनाच्या तडाख्यातून बाहेर पडली आहे. साधारण १०-१२ दिवस विलगीकरणात राहिल्यानंतर आज तिचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट नकारात्मक आल्यामुळे ती जाम खूष आहे आणि समाज माध्यमांवर तिने तिची ही खुषी सर्वांबरोबर शेयर पण केली आहे.
कालच विकी कौशल ने समाज माध्यमांवरून तो कोव्हीड निगेटिव्ह झाल्याची बातमी टाकली होती आणि आज कतरीना कैफ ने आनंदी होत ती कोव्हीड निगेटिव्ह झाल्याचे कळविले आहे. ‘माझा रिपोर्ट कोव्हीड निगेटिव्ह आलाय. मी कोरोना ने आजारी असताना ज्यांनी ज्यांनी माझ्या तब्येतीची विचारपूस केली आणि काळजी वाहिली त्यांना थँक यू. मला आपली समजण्यासाठी खूप प्रेम.’ अशा आशयाचे पोस्ट टाकले.
#katrinakaif 🌞 negative 🌞( everyone who checked up on me thank u , it was really sweet felt a lot of 💛)