मुंबई - कोविड -१९ ची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर नानावटी रुग्णालयात दाखल झालेले अमिताभ बच्चन उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याची माहिती आहे. मंगळवारी ज्येष्ठ अभिनेत्याने सोशल मीडियावरुन डॉक्टर आणि परिचारिकांसाठी कृतज्ञतापूर्वक पोस्ट लिहिली आहे.
मदतीसाठी सरसावलेल्या हाताचा एक फोटो शेअर करत बच्चन यांनी हिंदीमध्ये एक सुंदर कविता लिहिली आहे. पांढरे वस्त्र परिधान करुन, सेवेसाठी समर्पित असलेल्या, देवांचा अवतार असलेल्या, पीडितांचे साथीदार असलेल्या, ज्यांनी त्यांचा अहंकार मिटवलाय, आमच्या काळजीसाठी त्यांनी हे स्वीकारलंय, पूजा-दर्शनाच्या ठिकाणी असलेल्या या सेवेकऱ्यांनी मानवतेचा झेंडा फडकवत ठेवलाय, अशा अर्थाची ही कविता आहे.
शनिवारी ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन आणि त्याचा मुलगा अभिषेक यांचे कोविड -१९ चे पॉझिटिव्ह निदान झाले. रविवारी अॅन्टीजेन चाचणीनंतर ऐश्वर्या राय बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्या बच्चनही पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते.