मुंबई- सुशांत सिंग राजपूत आणि श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला 'छिछोरे' सिनेमा ६ सप्टेंबरला प्रदर्शित झाला. कॉलेज जीवनातील मैत्रीवर आधारित या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवशी या सिनेमाने ७.३२ कोटींची कमाई केली होती.
जाणून घ्या, छिछोरेचं फर्स्ट विकेंड कलेक्शन - वरुण शर्मा
दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनला शनिवार आणि रविवारच्या सुट्टीचा फायदा झाला. शनिवारी या सिनेमानं १२.२५ तर रविवारी १६.४१ कोटींची कमाई केली आहे.
दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनला शनिवार आणि रविवारच्या सुट्टीचा फायदा झाला. शनिवारी या सिनेमानं १२.२५ तर रविवारी १६.४१ कोटींची कमाई केली आहे. विकेंडपर्यंत सिनेमाने ३५.९८ कोटींचा गल्ला जमवत बॉक्स ऑफिसवर यश मिळवलं आहे.
छिछोरेला प्रदर्शित होताच पायरसीचे ग्रहण लागले होते. त्यामुळे, सिनेमाच्या कमाईवर याचा फरक पडणार हे निश्चित असतानाही चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या सिनेमात वरुण शर्मादेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे.