मुंबई - २०१८ मध्ये 'मनमर्जिया' चित्रपटापासून अभिषेक बच्चन रुपेरी पडद्यापासून दूर आहे. मात्र त्याने अलिकडेच कोलकात्यात 'बॉब विश्वास'च्या शूटींगला सुरूवात करत चाहत्यांना खूश करुन सोडले होते. याच्या शूटींगचे पहिले शेड्यूल यशस्वी पार पडले आहे.
शूटींगच्या पहिल्या दिवसापासून याचे अपडेट्स अभिषेक चाहत्यांना देत होता. त्यासोबतच काही फोटो आमि व्हिडिओही शेअर करीत होता. अभिषेकने हा फोटो शेअर केल्यानंतर त्याला बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी शुभेच्छाही दिल्या होत्या.