मुंबई- १४ फेब्रुवारीला दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यातून सीआरपीएफच्या ४० हून अधिक जवानांना वीरमरण आले. या हल्ल्याने संपूर्ण भारत हादरला होता. याच भ्याड हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली देणारं तू देश मेरा गाणं लवकरच भारतीयांच्या भेटीला येणार आहे.
पुलवामा हल्ल्यावर आधारित 'तू देश मेरा' गाण्याचं पोस्टर, टीझर स्वातंत्र्यदिनी होणार प्रदर्शित - स्वातंत्र्यदिन
गाण्याचं पहिलं पोस्टर सीआरएफने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केलं आहे. या गाण्यासाठी सीआरपीएफनं अमिताभ बच्चन, शाहरूख खान, आमिर खान, कार्तिक आर्यन, टायगर श्रॉफ, रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय यांचे आभार मानले आहेत.
या गाण्यात अनेक बॉलिवूड कलाकार झळकणार आहेत. गाण्याचं पहिलं पोस्टर सीआरपीएफने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केलं आहे. या गाण्यासाठी सीआरपीएफनं अमिताभ बच्चन, शाहरूख खान, आमिर खान, कार्तिक आर्यन, टायगर श्रॉफ, रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय यांचे आभार मानले आहेत.
या गाण्याला जावेद अली, जुबीन नौटीयाल आणि कबीर सिंग यांनी आवाज दिला आहे. या गाण्यातून देशाच्या खऱ्या हिरोंबद्दलच्या भावना मांडल्या जाणार आहेत. गाण्याचा टीझर स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्टला प्रदर्शित करण्यात येणार आहे. तर गाण्याच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झाली नाही.