मुंबई- बॉलिवूड अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर आज विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती होती. या जोडप्याने त्यांच्या खास दिवसाबद्दल काहीही बोलून दाखवले नसले तरी, त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. आता फरहान आणि शिबानीच्या इंटिमेट लग्नाचा पहिला फोटोही ऑनलाइन समोर आला आहे.
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये फरहान आणि शिबानी त्यांच्या लग्नाच्या पोशाखात दिसत आहेत. शिबानी लाल गाऊन घातलेली दिसत आहे, तर फरहान काळ्या रंगाच्या सूटमध्ये डॅपर दिसत आहे. खंडाळा येथील गीतकार जावेद अख्तर यांच्या फार्महाऊसवर लग्न समारंभाला फक्त जवळचे कुटुंबीय आणि मित्र उपस्थित होते.