मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित 'पीएम मोदी' चित्रपट येत्या २४ मे'ला म्हणजेच लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय मोदींची भूमिका साकारत आहे. दरम्यान प्रदर्शनाआधी विवेकने या चित्रपटावर आणि लोकसभा निवडणुकांवर प्रतिक्रिया दिली आहे.
'पीएम मोदी' आधी सत्तेत येणार, मग चित्रपटगृहात - विवेक ओबेरॉय - loksabha election result
माध्यमांसोबत संवाद साधताना विवेकने आधी २३ मे'ला मोदी सत्तेत येणार आणि २४ मे'ला पीएम नरेंद्र मोदी चित्रपटगृहात येणार, असे म्हटले आहे. 'पीएम मोदी' चित्रपट येत्या २४ मे'ला म्हणजेच लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
माध्यमांसोबत संवाद साधताना विवेकने आधी २३ मे'ला मोदी सत्तेत येणार आणि २४ मे'ला पीएम नरेंद्र मोदी चित्रपटगृहात येणार, असे म्हटले आहे. यासोबत दिल्ली आणि मुंबईमध्ये या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग ठेवले असता प्रेक्षकांकडून याला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे विवेकने सांगितले.
पीएम मोदी बायोपिक ११ एप्रिललाच प्रदर्शित केला जाणार होता. मात्र, निवडणूक आयोगाने निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाला स्थगिती दिल्याने आता निकालानंतर हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. नुकतंच या चित्रपटाचा नवा ट्रेलर प्रदर्शित केला गेला आहे. ज्यातून मोदींचा जीवनप्रवास उलगडला गेला आहे.