मुंबई - भारतीय महिला क्रिकेट संघाची महान खेळाडू आणि कर्णधार मिथाली राजचा बायोपिक लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 'शाब्बास मिथू' असे शीर्षक असलेल्या या चरित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.
मिथाली राजचा बायोपिक 'शाब्बास मिथू' फर्स्ट लूक पोस्टर - मिथाली राजचा बायोपिक 'शाब्बास मिथू' फर्स्ट लूक पोस्टर
तापसी पन्नूची मुख्य भूमिका असलेल्या 'शाब्बास मिथू' या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रसिध्द झाला आहे. महिला क्रिकेट संघाची झुंझार खेळाडू मिथाली राजचा हा बायोपिक असेल. . ५ फेब्रुवारी २०२१ ला हा सिनेमा रिलीज केला जाणार आहे.
अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत असून पोस्टरमध्ये तिचा लूक हुबेहुब मिथाली राजसारखा दिसत आहे. यापूर्वी महेंद्र सिंग धोनीच्या जीवनावर आधारित बायोपिक आला होता. भारताने १९८३ साली जिंकलेल्या विश्वचषकाच्या पराक्रमाची गाथाही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अशावेळी भारतीय महिला संघाची झुंझार खेळाडू मिथालीचा बायोपिक येतोय ही चांगली बातमी आहे.
'शाब्बास मिथू' चित्रपटाची निर्मिती वायकॉम १८ स्टुडिओच्या वतीने करण्यात येत आहे. राहुल ढोलकिया याचे दिग्दर्शन करतील. ५ फेब्रुवारी २०२१ ला हा सिनेमा रिलीज केला जाणार आहे.