मुंबई- बॉलिवूडमधील आघाडीचे दिग्दर्शक संजय लिला भन्साळी हे रोमॅन्टिक चित्रपटांचे बादशाह मानले जातात. त्यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. आता ते आणखी एक चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहेत.
संजय लिला भन्साळींच्या 'मलाल'चे पहिले पोस्टर प्रदर्शित - sharmin segal
'मलाल' चित्रपटाचं फर्स्ट लूक पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये शर्मिन शेगल आणि मिझान जाफरी यांची खास रोमॅन्टिक झलक पाहायला मिळत आहे.
'मलाल' असं शीर्षक असलेल्या या चित्रपटाचं फर्स्ट लूक पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये शर्मिन शेगल आणि मिझान जाफरी यांची खास रोमॅन्टिक झलक पाहायला मिळत आहे. संजय लिला भन्साळींची बहिण बेला सेगल यांची मुलगी शर्मिन सेगल आणि जावेद जाफरी यांचा मुलगा मिझान जाफरी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.
या चित्रपटाचा ट्रेलरदेखील आज प्रदर्शित केला जाणार असल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिली आहे. संजय लिला भन्साळी, भूषण कुमार, महावीर जैन आणि क्रिशन कुमार या चित्रपटाची निर्मिती करणार असून मंगेश हाडवळे यांचं दिग्दर्शन असणार आहे. येत्या २८ जुनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.