महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

हिमेशच्या 'मैं जहाँ रहूँ'ची अधिकृत घोषणा, फर्स्ट लूक प्रदर्शित - himesh reshmiya

'मैं जहाँ रहूँ' असं या चित्रपटाचं शीर्षक असणार आहे. चित्रपटाच्या नावासोबत यातील हिमेशचा फर्स्ट लूकही प्रदर्शित करण्यात आला आहे

'मैं जहाँ रहूँ'चं फर्स्ट लूक पोस्टर

By

Published : Apr 1, 2019, 1:06 PM IST

मुंबई- अभिनेता आणि गायक हिमेश रेशमिया लवकरच ४ नवीन चित्रपटांची घोषणा करणार आहे. या चारही चित्रपटात तो अभिनेत्याच्या भूमिकेत झळकणार आहे. यातील एका चित्रपटाची घोषणा रविवारीच करण्यात आली होती. जो 'द एक्सपोज'चा सिक्वल असणार आहे. या पाठोपाठ आता दुसऱ्या चित्रपटाचीही अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

'मैं जहाँ रहूँ' असं या चित्रपटाचं शीर्षक असणार आहे. चित्रपटाच्या नावासोबत यातील हिमेशचा फर्स्ट लूकही प्रदर्शित करण्यात आला आहे. या फोटोत तो विमानतळावर दिसत आहे. राजेश शेट्टी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. चित्रपट एका लव्ह स्टोरीवर आधारित असणार आहे.

२७ सप्टेंबरपासून चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे. दिल्ली आणि यूकेमध्ये हे चित्रीकरण केलं जाणार आहे. चित्रपटात एकूण ७ गाणी असून हिमेश आणि जावेद अख्तर यांनी या गाण्यांना आवाज दिला असल्याचे महटले जात आहे. या चित्रपटाशिवाय हिमेशने आर्मी ऑफिसर बिष्णू श्रेष्ठा यांच्या बायोपिकचे हक्कही विकत घेतले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details