महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अक्षय-कियाराच्या 'लक्ष्मी बॉम्ब'चं पहिलं पोस्टर प्रदर्शित, पाहा फोटो - kiara advani

अक्षय एका हॉरर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. 'लक्ष्मी बॉम्ब' असे या चित्रपटाचे शीर्षक आहे. या चित्रपटाचं पहिलं पोस्टर आता नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे.

'लक्ष्मी बॉम्ब'चं पहिलं पोस्टर प्रदर्शित

By

Published : May 18, 2019, 12:56 PM IST

मुंबई- बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार नुकताच 'केसरी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. यानंतर आता अक्षय एका हॉरर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. 'लक्ष्मी बॉम्ब' असे या चित्रपटाचे शीर्षक आहे.

या चित्रपटाचं पहिलं पोस्टर आता नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. चित्रपटाच्या या पहिल्या पोस्टरमध्ये अक्षयचा एक वेगळाच लूक पाहायला मिळत आहे. या फोटोत अक्षय आरशात पाहत असून डोळ्यात काजळ लावताना दिसत आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्याने हा फोटो शेअर केला आहे.

'लक्ष्मी बॉम्ब'चं पहिलं पोस्टर प्रदर्शित

या चित्रपटात 'एम.एस.धोनी' फेम अभिनेत्री कियारा अडवाणी अक्षयच्या अपोझिट झळकणार आहे. चित्रपट २०११ मध्ये आलेल्या 'मुनी २: कंचना' या हॉरर कॉमेडी तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटात कियारा आणि अक्षयशिवाय अमिताभ बच्चनही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. राघव लॉरेन्स या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून फॉक्स स्टार स्टुडिओजची निर्मिती असणार आहे. २०२० मध्ये ५ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details