बहुचर्चित 'बूँदी रायता' या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर प्रसिध्द करण्यात आले आहे. या फर्स्ट लूक पोस्टरवर हिमांश कोहली, सोनाली सैगल तसेच इतर कलाकारांसह रविकिशन झळकले आहेत. पोस्टरवरुन हा एक धमाल विनोदी चित्रपट असल्याचे संकेत मिळतात.
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी या पोस्टरबद्दलची माहिती ट्विटरवरुन दिली आहे.
'बूँदी रायता' चित्रपटाचे दिग्दर्शन कमल चंद्रा करत आहेत. याची निर्मिती रवि एस गुप्ता आणि कुलदिप भंडारी यांनी केली आहे.
या चित्रपटामध्ये नीरज सूद, अलका अमीन, राजेश शर्मा, कुलदीप भंडारी, नरेश वोहरा, तनुजा गुप्ता आणि इशलिन प्रसाद या कलाकारांच्या भूमिका आहेत. मंगळवारी अंधेरीतील सन सिटीमध्ये या चित्रपटाचा फर्स्टलूक जारी करण्यात आला. या चित्रपटाचा मूहुर्तही पार पडला आहे. सोशल मीडियावर बूँदी रायताचे पोस्टर चाहत्यांना आवडल्याचे दिसत आहे.