मुंबई - सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांची जोडी असलेला 'भारत' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'भाईजान' आणि 'चिकनी चमेली'च्या जोडीला पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतानाच चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.
या पोस्टरमध्ये सलमानचा असा लूक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे, ज्यात त्याची दाढी आणि केस पूर्णपणे पांढरे आहेत. हा फोटो शेअर करत सलमानने याला कॅप्शनही दिले आहे. जितने सफेद बाल मेरे सर और दाढी में हैं, उससे कहीं ज्यादा रंगीन मेरी जिंदगी रही हैं, असं कॅप्शन या फोटोला आहे.
दिग्दर्शक अली अब्बास जफर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. 'भारत' चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठीही चाहते आतुर आहेत. १० दिवसानंतर या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार असल्याचे कॅटरिनाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सांगितले आहे. चित्रपटात सलमान खानच्या वेगवेगळ्या व्यक्तीरेखा पाहायला मिळणार आहेत. तर ६ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.