मुंबई- चुलबूल पांडे इज बॅक असं म्हणत भाईजान आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. आजपासून त्याच्या दबंग ३ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. सलमानने आता या चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सलमानने शेअर केला 'दबंग ३'च्या सेटवरील पहिला फोटो - salman khan
दबंग ३च्या सेटवरील पहिला दिवस असे कॅप्शन देत त्याने हा फोटो शेअर केला. प्रभूदेवा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत

दबंग ३ च्या सेटवरील फोटो
दबंग ३च्या सेटवरील पहिला दिवस असे कॅप्शन देत त्याने हा फोटो शेअर केला. यात भाईजानची पाठमोरी झलक दिसत आहे. ज्यात त्याने दबंगच्या इतर भागांप्रमाणेच शर्टच्या कॉलरला गॉगल लावला आहे. फोटोत सलमानची पाठमोरी तर प्रभूदेवाची संपूर्ण झलक पाहायला मिळत आहे.
प्रभूदेवा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. इंदौरमध्ये आजपासून चित्रीकरणलाा सुरूवात झाली आहे. त्यामुळे आता सेटवरील नवनवीन फोटो प्रेक्षकांच्या भेटीला येतच राहणार आहेत. सलमानच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे.