मुंबई - अभिनेता इम्रान हाश्मी लवकरच 'चेहरे' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील इम्रान हाश्मीचा पहिला लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यानंतर आता चित्रपटातील मुख्य अभिनेत्री असलेल्या रिया चक्रवर्तीची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. रिया नुकतीच 'जलेबी' चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
'चेहरे'मधील अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा फर्स्ट लूक आला समोर, पाहा फोटो - emran hashmi
चित्रपटातील मुख्य अभिनेत्री असलेल्या रिया चक्रवर्तीची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. रिया नुकतीच 'जलेबी' चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
चेहरे चित्रपटात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चनही मुख्य भूमिकेत झळकणार असून इम्रान त्यांच्यासोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 'चेहरे' हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट असणार आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि सरस्वती एन्टरटेन्मेंट अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे.
पुढच्या वर्षी २१ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होतोय. रूमी जाफरी या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. 'व्हाय चीट इंडिया' चित्रपटाच्या अपयशानंतर इमरानच्या या चित्रपटाला आता प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.