मुंबई- एकेकाळी प्रत्येक तरुणीच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेता जॅकी श्रॉफ आपल्या पुनरागमनासाठी सज्ज झाले आहेत. प्रस्थानम या सिनेमातून ते पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी येत आहे. अशात आता या चित्रपटातील त्यांचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.
जॅकी श्रॉफचा 'प्रस्थानम'मधील फर्स्ट लूक प्रदर्शित, पाहा फोटो - संजय दत्त
लांब केस आणि काळ्या कुर्त्यातील जॅकी यांचा लूक प्रेक्षकांची मनं जिंकणारा आहे. दरम्यान प्रस्थानम हा तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे. या रिमेकमध्ये संजय दत्त आणि मनीषा कोईराला यांच्या मुख्य भूमिका आहेत
लांब केस आणि काळ्या कुर्त्यातील जॅकी यांचा लूक प्रेक्षकांची मनं जिंकणारा आहे. दरम्यान प्रस्थानम हा तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे. या रिमेकमध्ये संजय दत्त आणि मनीषा कोईराला यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन देवा कट्टा करणार आहेत.
सिनेमाची निर्मिती संजयची पत्नी मान्यता दत्त आणि संजय दत्त प्रोडक्शनमार्फत केली जाणार आहे. येत्या २० सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटातील संजयचा रॉयल लूकही प्रदर्शित झाला होता. या लूकलाही प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.