मुंबई - दिग्दर्शक रुमी जाफरी यांच्या आगामी 'चेहरे' चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन, इम्रान हाश्मी आणि अन्नू कपूर एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा आणि इम्रान हाश्मीचा लूक काही दिवसांपूर्वीच समोर आला होता. आता अन्नू कपूर यांचाही फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.
'चेहरे' चित्रपटातील अन्नू कपूर यांचा करारी फर्स्ट लूक - First Look of Annu Kapoor in Chehre
'चेहरे' या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा आणि इम्रान हाश्मीचा लूक काही दिवसांपूर्वीच समोर आला होता. आता अन्नू कपूर यांचाही फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटातील अन्नू कपूर यांचा फर्स्ट लूक पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे. हा चित्रपट गुढ रहस्यावर आधारित आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांचा नवा लुकही पाहायला मिळणार आहे. अलिकडेच त्यांनी या चित्रपटातील त्यांचे काही लूक सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
'चेहरे' हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट असणार आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि सरस्वती एन्टरटेन्मेंट अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. १७ जुलैला 'चेहरे' हा चित्रपट प्रदर्शित होतोय.