हैदराबाद: अभिनेता-निर्माता राणा दग्गुबाती आज आपला ३६ वा वाढदिवस साजरा करीत असून त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रसिध्द झाला आहे. निर्मात्याने त्याचा हा लूक सोशल मीडियावर प्रसिध्द केला आहे.
विराट पर्व या चित्रपटात ९० च्या दशकातील ग्रामीण तेलंगणाची पार्श्वभूमी दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाची कथा नक्षलावादाला स्पर्श करणारी असून राणा दग्गुबाती यात प्रमुख भूमिकेत आहे. सुरेश प्रॉडक्शन्सच्या अधिकृत हँडलने राणाचा पहिला लूक प्रसिद्ध केला.
पहिल्या लूकमध्ये राणा नक्षलवाद्याच्या भूमिकेत असल्याने तो सशस्त्र दिसत आहे. पाठीमागे लांल झेंडे आणि चकमकीत निघालेला दूर दिसत आहे. त्यामुळे या चित्रपटात हिंसा असणार हे निश्चित.