मुंबई- हॉलिवूडच्या 'द लॉयन किंग' या सुपरहिट चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनची गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा आहे. या सिनेमातील काही पात्रांसाठी बॉलिवूडच्या कलाकारांचा आवाज वापरण्यात आला आहे. यामुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली असतानाचा शुक्रवारी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला.
‘द लायन किंग’ची पहिल्याच दिवशी दोन आकडी कमाई, जाणून घ्या गल्ला - shahrukh khan
हा सिनेमा भारतातील २१४० स्क्रिन्सवर हिंदी, तमिळ, इंग्रजी आणि तेलुगू अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. आता या सिनेमाची पहिल्या दिवशीची कमाई समोर आली आहे.
आता या सिनेमाची पहिल्या दिवशीची कमाई समोर आली आहे. द लायन किंगने पहिल्याच दिवशी दोन आकडी कमाई केली असून बॉक्स ऑफिसवर १३.१७ कोटींचा गल्ला जमावला आहे. तर शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवसांत चित्रपटाच्या कमाईचे आकडे निश्चितच वाढणार आहेत.
हा सिनेमा भारतातील २१४० स्क्रिन्सवर हिंदी, तमिळ, इंग्रजी आणि तेलुगू अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. दरम्यान या चित्रपटाला शाहरुख खान, आर्यन खान, आशिष, आसरानी, श्रेयस तळपदे, संजय मिश्रा, नेहा गारगवे यांनी आवाज दिला आहे. आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कोणते विक्रम रचणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.