मुंबई- गणिततज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित 'सुपर ३०' चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता हृतिक रोशनने आनंद कुमार यांची भूमिका साकारली असून चित्रपटाचं पहिल्या दिवशीचं कलेक्शन समोर आलं आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हे आकडे सांगितले आहेत.
हृतिकच्या 'सुपर ३०'ने पहिल्या दिवशी जमवला इतक्या कोटींचा गल्ला - anand kumar
हा चित्रपट विकास बहलच्या मी टू वादामुळे, कंगनासोबतच्या रिलीज डेच्या वादामुळे आणि आनंद कुमारांची ही कथा खोटी असल्याचा आरोप अनेकांनी केल्याने चांगलाच चर्चेत होता. मात्र, कलेक्शन पाहता या चर्चांचा फारसा फायदा चित्रपटाला झालेला दिसत नाही.
पहिल्या दिवशी चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून सिनेमाने ११.८३ कोटींचा गल्ला जमावला आहे. तर शनिवार आणि रविवारच्या सुट्टीचा फायदा चित्रपटाच्या कलेक्शनला होऊन विकेंडला कमाईच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईमधील प्रेक्षकांचा चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान या चित्रपटाचं दिग्दर्शन विकास बहलनं केलं आहे. हा चित्रपट विकास बहलच्या मी टू वादामुळे, कंगनासोबतच्या रिलीज डेच्या वादामुळे आणि आनंद कुमारांची ही कथा खोटी असल्याचा आरोप अनेकांनी केल्याने चांगलाच चर्चेत होता. मात्र, कलेक्शन पाहता या चर्चांचा फारसा फायदा चित्रपटाला झालेला दिसत नाही.