मुंबई- पुनित मल्होत्राद्वारा दिग्दर्शित 'स्टूडंट ऑफ द ईअर २' चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटातून अभिनेत्री अनन्या पांडे आणि तारा सुतारियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. तर या बॉलिवूडच्या नव्या स्टूडंटचं स्वागत करत प्रेक्षकांनी चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला आहे.
बॉलिवूडच्या नव्या स्टूडंटचं प्रेक्षकांनी केलं स्वागत, पहिल्या दिवशी केली इतकी कमाई - tara sutariya
पहिल्याच दिवशी इतकी कमाई करणार हा टायगरचा दुसरा चित्रपट ठरला आहे. याआधी २०१८ मध्ये आलेल्या त्याच्या 'बागी २' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी २५.१० कोटींची कमाई केली होती.

पहिल्या दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १२.६ कोटींची कमाई केली आहे. तर शनिवार आणि रविवारी कमाईत वाढ होण्याची शक्यता चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी वर्तवली आहे. दरम्यान या चित्रपटात अभिनेता टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत आहे.
पहिल्याच दिवशी इतकी कमाई करणार हा टायगरचा दुसरा चित्रपट ठरला आहे. याआधी २०१८ मध्ये आलेल्या त्याच्या 'बागी २' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी २५.१० कोटींची कमाई केली होती. आता टायगरचा हा चित्रपट १०० कोटींचा गल्ला पार करण्यात यशस्वी ठरतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.