मुंबई- दिलजीत दोसांझ, क्रिती सेनॉन आणि वरूण शर्मा यांच्या मुख्य भूमिका असलेला 'अर्जुन पटियाला' चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. याच दिवशी कंगना आणि राजकुमार रावचा 'जजमेंटल हैं क्या' चित्रपटही प्रदर्शित झाल्याने कोण बाजी मारणार याकडेच प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं होतं. अशात आता दोन्ही चित्रपटांची पहिल्या दिवशीची कमाई समोर आली आहे.
क्रिती-दिलजीतची जोडी नाही जिंकू शकली प्रेक्षकांची मनं? केली इतकी कमाई - मोहित जुगराज
'अर्जुन पटियाला' चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. याच दिवशी कंगना आणि राजकुमार रावचा 'जजमेंटल हैं क्या' चित्रपटही प्रदर्शित झाल्याने कोण बाजी मारणार याकडेच प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं होतं. अशात आता दोन्ही चित्रपटांची पहिल्या दिवशीची कमाई समोर आली आहे.
क्रिती आणि दिलजीतच्या या चित्रपटानं पहिल्या दिवशी केवळ १.२५ कोटींची कमाई केली असल्याचं समोर आलं आहे. तर कंगनाच्या 'जजमेंटल हैं क्या'नं पहिल्या दिवशी ६ ते ८ कोटींचा गल्ला जमावल्याचा अंदाच वर्तवला जात आहे. त्यामुळे, कंगनासमोर क्रितीचा चित्रपट अपयशी ठरला आहे.
दरम्यान या सिनेमात क्रिती, दिलजीत आणि वरूण शर्माशिवाय सिमा पहवा, मोहम्मद अय्यूब आणि रोनीत रॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. मोहित जुगराज यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. आता शनिवार आणि रविवारी या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये कितपत वाढ होते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.