हैदराबाद - दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम अडचणीत आले आहेत. पेटा (पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स) च्या तक्रारीवरून चित्रपट दिग्दर्शकाविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मणिरत्नम यांच्या 'पोन्नीयन सेल्वन -1' चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. हैदराबादमध्ये शुटिंगच्या दरम्यान घोड्याचा अपघाती मृत्यू झाला होता. याला दिग्दर्शक जबाबदार असल्याचे ठरवून पेटा अंतर्गत त्यांच्या विरोधात पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
मीडियातील बातमीनुसार, पेटाने मणिरत्नम यांचे फिल्म प्रॉडक्शन हाऊस मद्रास टॉकीज आणि घोड्याच्या मालकाविरोधात अब्दुल्लापुरमेट पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला आहे. त्याचबरोबर एनिमल वेलफेअर बोर्डाने मणिरत्नम यांना चौकशीसाठी बोलावले आहे.