मुंबई- अभिनेता राहूल बोस गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. तो आपल्या कोणत्या चित्रपटामुळे नाही तर 442 रुपयांच्या केळीमुळे चर्चेत आला आहे. होय, चंदीगडच्या एका पंचतारांकित हॉटेलामध्ये त्याने दोन केळी मागवल्या आणि या हॉटेलने चक्क 442 रुपयांचे बिल फाडले.
'त्या' 2 केळींचे बिल पडले महागात, राहुल बोसच्या तक्रारीनंतर पंचतारांकित हॉटेलला दंड
चंदीगडच्या एका पंचतारांकित हॉटेलामधून राहुल बोसनं दोन केळी मागवल्या आणि या हॉटेलने चक्क 442 रूपयांचे बिल फाडले. प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली. आता उत्पादन शुल्क विभागाने या हॉटेलवर कारवाई करत २५ हजारांचा दंड ठोठावला आहे.
यानंतर या संपूर्ण प्रकरणाबद्दल माहिती देत राहूलने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. जो चांगलाच व्हायरल झाला आणि प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली. आता उत्पादन शुल्क विभागाने या हॉटेलवर कारवाई करत २५ हजारांचा दंड ठोठावला आहे.
राहूल बोस आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सध्या चंदीगडमध्ये असून येथेच जेडब्ल्यू मॅरिएट या पंचतारांकित हॉटेलमध्ये तो वास्तव्यास होता. राहूलने या हॉटेलमधीलच आपला व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात तो येथील सर्व सोयी-सुविधांचे कौतुक करत होता. मात्र, शेवटी तो या हॉटेलने २ केळ्याचे आकारलेले पैसे आणि यावर लावलेला जीएसटी बिलाच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवत होता. याच व्हिडिओची दखल घेत हॉटेलवर कारवाई करण्यात आली.