मुंबई- २०१८मध्ये रिलीज झालेला सुपरस्टार यशचा 'केजीएफ' हा चित्रपट त्यावर्षीचा सर्वात लोकप्रिय चित्रपट होता आणि त्याच्या रॉकी या पात्राने देशभर दहशत निर्माण केली होती.
'केजीएफ 2' हा वर्ष २०२० मधील सर्वाधिक बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. ज्यामध्ये यश पुन्हा रॉकी भाईच्या भूमिकेत दिसणार आहे. यश व्यतीरिक्त अभिनेता संजय दत्त आणि श्रीनीधी शेट्टी यांची देखील भूमिका पाहायला मिळणार आहे.
१६ जुलै २०२१ रोजी 'केजीएफ 2' हा बहुप्रतीक्षित चित्रपट थिएटरमध्ये सर्वत्र झळकेल. सुपरस्टार यशची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची अधिकृत घोषणा झाली असून ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटरवरुन ही बातमी दिली आहे.