मुंबई -चित्रपट अभिनेता आदित्य पांचोली (Aditya Pancholi Controversy) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सॅम फर्नांडिस चित्रपट निर्मात्याने आदित्य पांचोलीवर शिवीगाळ, धमकी आणि मारहाण केल्याचा (Sam Fernendis filed complained against aditya pancholi) आरोप केला आहे. आदित्य पांचोली आणि चित्रपट निर्माता सॅम फर्नांडिस यांच्याविरुद्ध मुंबईतील जुहू पोलीस ठाण्यात (Juhu Police Station) क्रॉस तक्रार नोंदवण्यात आली आहे.
आदित्यने केली शिवीगाळ आणि मारहाण
जेव्हा कोणताही निर्माता सूरजसोबत चित्रपट बनवण्यास तसेचआर्थिक मदत करण्यास तयार नव्हते. तेव्हा 27 जानेवारी रोजी आदित्य पांचोलीने मला जुहू येथील सन अँड सन हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले आणि त्याचवेळी पांचोलीने धमकी द्यायला सुरुवात केली की तुला माझ्या मुलासोबत चित्रपट बनवावा लागेल, असेही सॅमने सांगितले. त्याने दारुच्या नशेत शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप फर्नांडिसने केला आहे.