मुंबई -मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री देशवासियांना संबोधित केले. ज्यात त्यांनी 20 लाख कोटींचे नवीन आर्थिक पॅकेज जाहीर केले. तसेच लॉकडाऊनचा चौथा टप्पा देशात असेल, याचे स्पष्ट संकेत दिले. मोदी यांच्या या घोषणेनंतर अनेक दिग्गज कलाकारांनी मोदी यांच्यावर ट्विटद्वारे निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी प्रवासी, मजूर यांच्याबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
हेही वाचा...कोरोनाच्या संकट काळातून आत्मविश्वास व कृतीतून बाहेर पडू शकतो : नितीन गडकरी
प्रसिद्ध संगीतकार विशाल दादलानी यांनी ट्विटरवरुन आपला संताप व्यक्त केला आहे. 'आता कोणी तरी म्हटले की, २० लाख कोटींचे प्रोत्साहन पॅकेज देण्यात येईल. गरिबांचे काहीच महत्व नाही का? मला अद्याप परप्रांतीय कामगारांविषयी कोणतीही चर्चा होताना दिसत नाहीये, तुम्हाला?' असे ट्विट दादलानी यांनी केले.
विशाल दादलानी यांचे पहिले ट्विट...
विशाल दादलानी यांनी यानंतर आणखी एक ट्विट केले. ज्यात त्यांनी लिहिले की, 'जो माणूस आपल्या कुटुंबासमवेत आपल्या स्वतः पायी शहर ते गाव जाण्याचा निश्चय करतो, त्याहून जास्त आतनिर्भर को कोण आहे? कि, त्यांतचे आत्मबल हे त्यांची मजबूरी आणि लाचारी आहे ?' असे ट्विट विशाल यांनी केले आहे.
विशाल दादलानी यांचे दुसरे ट्विट...
विशाल यांचे दुसरे ट्विट मोदींच्या आत्मनिर्भर भारत यावर कटाक्ष टाकणारे आहे.
अभिनेता आणि राजकारणी प्रकाश राज यांनीही मोदी यांच्या कार्यक्रमावर तिरकस टिप्पणी केली आहे. ज्यात त्यांनी 'आजकाल रात्री आठ वाजता रिकामी भांडी अधिक वाजतात. #JustAssking' असे ट्विट केले आहे.