मुंबई - पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राच्या अडचणीत भर पडत आहे. राज कुंद्राला अटक केल्यानंतर आता त्याच्या सहकाऱ्यांच्याही मुस्क्या आवळण्याच्या तयारीत मुंबई पोलीस आहेत. त्याच्या कंपनीत काम करणाऱ्या 3 निर्मात्यांसह अभिनेत्री गहना वशिष्ठच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे.
राज कुंद्राच्या कंपनीत काम करणारे तीन निर्माते आणि गहना वशिष्ठ यांच्या विरोधात मालाड येथील मालवणी पोलीस स्टेशनमध्ये एका अभिनेत्रीने तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर गहना वशिष्ठने एक व्हिडिओ जारी करुन मुंबई क्राईम ब्रँचवर आरोप केले आहेत.