महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 30, 2021, 7:20 PM IST

ETV Bharat / sitara

आलिया भट्टच्या विरोधात सांताक्रूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

आलिया भट्ट नुकतीच ‘मान्यवर’या प्रसिद्ध कपड्यांच्या जाहिरातीत झळकली आहे. आलियाची ही जाहिरात सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून यामुळे ती प्रचंड चर्चेत आली आहे. या जाहिरातीत आलिया भट ही कन्यादान प्रथेविषयी बोलताना दिसत आहे. एका व्यक्तीने तिच्याविरूद्ध मुंबईतीस सांताक्रूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

आलिया भट्ट
आलिया भट्ट

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच कोणत्यातरी कारणामुळे चर्चेत असते. मागच्या काही दिवसांपासून ती बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरसोबतच्या रिलेशनमुळे चर्चेत आहे. तसेच आलिया भट्ट नुकतीच ‘मान्यवर’या प्रसिद्ध कपड्यांच्या जाहिरातीत झळकली आहे. आलियाची ही जाहिरात सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून यामुळे ती प्रचंड चर्चेत आली आहे. या जाहिरातीत आलिया भट्ट ही कन्यादान प्रथेविषयी बोलताना दिसत आहे. मात्र या जाहिरातीमुळे हिंदू धर्माचा अपमान झाल्याचं सांगत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

आलिया भट्ट्च्या विरोधात तक्रार दाखल

आता एका व्यक्तीने तिच्याविरूद्ध मुंबईतीस सांताक्रूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. या जाहिरातीमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचे कारण देत या तक्रारदाराने आलियाच्या व कंपनीच्या विरूद्ध तक्रार दाखल केली आहे.

आलिया भट्ट्च्या विरोधात तक्रार दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, आलिया भट्नेट या जाहिरातीच्या माध्यमातून हिंदूचा भावना दुखावल्या आहेत आणि कन्यादानची चुकीची माहिती दाखल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. म्हणूनच याप्रकरणी मान्यवर कंपनी आणि आलिया भट यांच्या विरोधात एका व्यत्तीने मुंबई पोलीसांकडे तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

आलिया भट्ट्च्या विरोधात तक्रार दाखल

आलिया भट्ट ही नुकतीच मान्यवर या कपड्यांच्या जाहिरातीत दिसली आहे. या जाहिरातीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आलिया नववधूच्या पोशाखात लग्न मंडपात दिसत आहे. यात आलिया तिच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य तिच्यावर किती प्रेम करतात, हे सांगताना दिसत आहे. मात्र या जाहिरातीदरम्यान तिने विवाह सोहळ्यातील कन्यादानाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मुलीला परक्याचे धन का मानले जाते? असा प्रश्न तिने विचारला आहे. “मुलगी ही दान करण्याची गोष्ट नाही, त्यामुळे कन्यादान नाही कन्यामान,” असा संदेश या व्हिडीओतून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

हेही वाचा - अभिनेत्री सौजन्याची सिलींग फॅनला लटकून आत्महत्या

ABOUT THE AUTHOR

...view details