महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'दोस्ताना २' चे कास्टिंग करताना करण जोहर घेतोय काळजी - कार्तिकच्या जागी दुसऱ्या कलाकाराची निवड

निर्माता करण जोहरने 'दोस्ताना २' मधून कार्तिक आर्यनला बाहेर काढल्यानंतर त्याच्या जागी नव्या कलाकाराचा शोध जारी आहे. नेपोटिझमचा आरोप कसा टाळता येईल यावर धर्मा प्रडक्शन भर देत आहे.

karan johar dostana 2 casting
'दोस्ताना २' चे कास्टिंग करताना करण जोहर घेतोय काळजी

By

Published : May 4, 2021, 5:34 PM IST

मुंबई - 'दोस्ताना २' या चित्रपटातून कार्तिक आर्यनला बाहेर काढल्यानंतर त्या जागी दुसऱ्या कलाकाराचा शोध निर्माता करण जोहर घेत आहे. कार्तिकच्या जागी दुसऱ्या कलाकाराची निवड करताना धर्मा प्रॉडक्शन खूप काळजी घेत आहे.

कार्तिकच्या 'दोस्ताना 2' मधून बाहेर पडण्याने मनोरंजन जगतात खळबळ माजली होती. कार्तिकच्या हकालपट्टीनंतर अनेक कलाकारांची नावे चर्चेत आहेत. राजकुमार राव, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, सिद्धांत चतुर्वेदी आणि अक्षय कुमार या नावांचा धर्मा प्रॉडक्शन विचार करीत असल्याचे समजते.

करण जोहरवर नेपोटिझमचा आरोप होत असल्यामुळे सावगिरी बाळगत कलाकाराची निवड केली जात आहे. अक्षय कुमारला यासाठी प्राधान्य दिले जात आहे. एक म्हणजे अक्षय हा करण जोहरचा मित्र आहे आणि दुसरे म्हणजे अक्षयमुळे चित्रपट लवकर पूर्ण होऊ शकतो.

कोलिन डी'कुन्हा दिग्दर्शित 'दोस्ताना 2' चित्रपटात अभिनेत्री जान्हवी कपूरची मुख्य भूमिका आहे. टीव्ही अभिनेता लक्ष्य या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

हेही वाचा -बुध्दीजीवी लोक भारताची प्रतिमा खराब करीत आहेत - कंगना रणौत

ABOUT THE AUTHOR

...view details