मुंबई- बॉलिवूड अभिनेत्रींना प्रसिद्धीसोबतच अनेकांच्या टीकांचा सामनाही करावा लागतो. विशेषतः सोशल मीडियावर ट्रोलर्स अभिनेत्रींच्या कपड्यांवरून त्यांच्यावर टीका करण्याची संधी सोडत नाही. अशाच एका ट्रोलरला आता फातिमा सना शेख हिने सडेतोड उत्तर दिले आहे.
ट्रोलरला फातिमाचं सडेतोड उत्तर, म्हणाली - 'माय बॉडी, माय रूल्स' - social media
करत एका यूजरने तू मुस्लीम आहेस त्यामुळे व्यवस्थित कपडे घालत जा, असा खोचक सल्ला फातिमाला दिला होता. यावर प्रतिक्रिया देत, मी तुला ब्लॉक करत असल्याचे फातिमाने म्हटले आहे.
फातिमाने इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपला एक फोटो शेअर केला होता. या फोटोवर कमेंट करत एका यूजरने तू मुस्लीम आहेस त्यामुळे व्यवस्थित कपडे घालत जा, असा खोचक सल्ला तिला दिला होता. यावर प्रतिक्रिया देत, मी तुला ब्लॉक करत असल्याचे फातिमाने म्हटले आहे.
एवढेच नाही, तर 'माय बॉडी... माय रूल, युअर गमला...युअर फुल', असेही फातिमा म्हणाली. कपड्यांवरून ट्रोल होण्याची ही फातिमाची पहिली वेळ नाही. याआधी तिला अनेकदा ट्रोलर्सच्या कमेंटचा सामना करावा लागला आहे. याबद्दल एका मुलाखतीत बोलताना तिने म्हटले होते, की मी कोणाच्या घाणेरड्या कमेंट का सहन करू, कोणी असे केल्यास मी त्याला सरळ ब्लॉक करते.