मुंबई -‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेख सध्या चांगलीच चर्चेत आहे. गेल्यावर्षी तिचे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आणि दोन्हींना उत्तम प्रतिसाद मिळाला होता. दिवाळीच्या सुमारास ‘सूरज पे मंगल भारी’ हा चित्रपटगृहांत प्रदर्शित होणारा पहिला मोठा चित्रपट होता. तसेच तिची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला अनुराग बासू दिग्दर्शित ‘ल्युडो’ डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता व त्यालाही चांगले रिव्ह्यूज मिळाले होते. आता फातिमाला बरेच प्रोजेक्ट्स मिळाले असून त्यासाठी ती तयारी करीत आहे.
पोस्ट वर्कआउट सेल्फी तो बनती है -
हल्ली प्रत्येक कलाकाराला फिट राहणे आत्यंतिक गरजेचे झालेले आहे. अभिनेत्यांबरोबर अनेक अभिनेत्रीसुद्धा फिटनेसकडे गांभीर्याने बघू लागल्या असून ‘जिम ट्रेनिंग’ त्यांच्या जीवनाचा नित्य भाग झाला आहे. आता फातिमा सना शेखचंच बघाना फिट राहण्यासाठी ही अभिनेत्री कठीण ट्रेनिंग करत असून आपल्याला हवा असलेला बांधा बनविण्यात गर्क आहे. एका व्हिडिओमध्ये फातिमा मशीनमधून खाली-वर उड्या मारताना आणि अथक प्रयत्न करताना दिसत आहे. तिने चाहत्यांसमवेत वर्कआउट सेल्फीदेखील शेअर केली आहे. ज्यामुळे ती आता कोणत्या चित्रपटासाठी शूटिंग करणार आहे, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. एका पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, 'पोस्ट वर्कआउट सेल्फी तो बनती है'