मुंबई - आमिर खान अभिनित ‘दंगल’मधून फातिमा सना शेखने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. लॉकडाऊन शिथिल झाल्यावर गेल्या वर्षी दिवाळीत प्रदर्शित होणारा पहिला-दुसरा चित्रपट ‘सूरज पे मंगल भारी’ मधून फातिमा ने मराठी मुलगी साकारली होती व ती अस्खलित मराठी बोलताना आढळली होती. तिच्या कामाचीही तारीफ झाली होती व लॉकडाऊनमधेच ओटीटी वर प्रदर्शित झालेल्या ‘ल्युडो’मध्येसुद्धा तिचे काम वाखाणले गेले होते. पण तुम्हाला माहिती आहे का अभिनेत्री बनण्यापूर्वी फातिमा सना शेख कोणते काम करायची?
अभिनेत्री होण्याआधी हे काम करायची फातिमा सना शेख
फातिमा समाज माध्यमांवर उत्तमोत्तम छायाचित्रांची मालिका सादर करीत असते व सर्वांना तिचे फोटोज खूपच आवडतात. 'दंगल गर्ल' म्हणून ओळखल्या जाणार्या फातिमाची आणखी एक बाजू आहे ज्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. अभिनयात पदार्पण करण्यापूर्वी फातिमा एक ‘फ्रीलान्स फोटोग्राफर’ होती आणि तिच्या ‘फ्रेंड्स सर्कल’ सोबत काम करायची. त्यामुळेच ती अपलोड करीत असलेली फोटोंची मालिका, तिच्या मागील व्यवसायातील ज्ञान व अनुभवामुळे, विशेष उल्लेखनीय दिसते.