आमिर खान अभिनित ‘दंगल’ मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेली फातिमा सना शेख काही दिवसांपूर्वी ‘वेगळ्याच’ कारणांसाठी चर्चेत होती. या सुंदर आणि तरुण अभिनेत्रीच्या प्रेमात आमिर खान वेडा झालाय आणि त्यामुळेच त्याने आपली दुसरी बायको किरण रावसोबत घटस्फोट घेतला अशा चर्चांना समाज माध्यमांवर ऊत आला होता. परंतु फातिमाने नेहमीच आणि यावेळीही त्या गोष्टीचं खंडन केले आणि तिचा आमिर खानच्या डिव्होर्सशी काहीही संबंध नसल्याचे ठासून सांगितले होते. फातिमा आपल्या चित्रपटांच्या शूट्समध्ये बिझी आहे आणि एकटीच व्यावसायिक मार्गक्रमण करीत आहे. फातिमा नेहमीच समाज माध्यमांवर सक्रिय असते आणि आता तिने टाकलेले कृष्ण धवल फोटोस भरपूर लाईक्स मिळवीत आहेत.
फातिमाने नुकतेच एक अंडरवॉटर शूट केले आणि त्यासुमारास तिने काही फोटो काढून घेतले. ‘वॉटर बेबी’ लूकचे स्विमिंग पूल मधील हे फोटो पाण्यात आग लावताना दिसताहेत. फातिमाचा निरागस चेहरा आणि हॉट लूक्स नजरबंदी करणारे आहेत. फोटोत दिसणारे तिचे बोलके डोळे हजारो शब्द बोलून जातात. इंस्टाग्राम वर अनेक सेलिब्रिटीज आपले फोटोज पोस्ट करतात आणि तेही बरेच बोलके असतात. परंतु फातिमाच्या डोळ्यांतील अगतिकता लक्ष वेधून घेणारी असून तिच्याबाबत अनुकंपासुद्धा जागते.
फातिमा सना शेख गेल्यावर्षी ‘सूरज पे मंगल भारी’ आणि ‘ल्युडो’ या चित्रपटांतून दिसली होती आणि चोहीकडून तिच्या कामाची प्रशंसा झाली होती. ‘सूरज पे मंगल भारी’ चित्रपटात तिने मराठी मुलगी साकारली होती आणि तिने बऱ्याच संवादांमध्ये मराठी शब्द आणि वाक्ये वापरली होती, अस्खलितपणे. ती हल्लीच नेटफ्लिक्स वरील ‘अजीब दास्तानस’ या वेबफिल्म मध्ये दिसली होती आणि आपल्या भूमिकेला न्याय दिला होता.