महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मराठमोळ्या साडीत पडद्यावर अवतरणार 'दंगल गर्ल' फातिमा सना शेख - Marathi look of Fatima Sana Shaikh

'सूरज पे मंगल' चित्रपटातील मनोज बाजपेयी आणि दिलजीत दोसन्ज यांचा फर्स्ट लूक प्रसिध्द केल्यानंतर निर्मात्यांनी आता फातिमा सना शेखचा फर्स्ट लूक प्रसिध्द केला आहे.

Fatima Sana Shaikh
'दंगल गर्ल' फातिमा सने शेख

By

Published : Feb 14, 2020, 3:39 PM IST

मुंबई - 'दंगल' चित्रपटात हरयाणवी छोरी साकारलेल्या फातिमा सना शेखचा नवा लूक प्रसिध्द झालाय. सूरज पे मंगल भारी या चित्रपटात ती मराठी मुलीची भूमिका साकारणार आहे.

फातिमाच्या फर्स्ट लूकमध्ये ती साडीमध्ये खूप सुंदर दिसत आहे.

'दंगल गर्ल' फातिमा सने शेख

तिचा सहकलाकार मनोज बाजपेयीनेही इन्स्टाग्रामवर फातिमा आणि सुप्रिया पिळगावकरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

'दंगल गर्ल' फातिमा सने शेख

'सूरज पे मंगल भारी'च्या महिलांसोबत ट्रेनमध्ये, असे त्याने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. फातिमा यात मराठमोळ्या पध्दतीच्या साडीत दिसत आहे.

फातिमा मराठी मुलीची भूमिका साकारण्यासाठी भाषेवर आणि तिच्या बॉडी लँग्वेजवर मेहनत करीत आहे.

'सूरज पे मंगल भारी' हा विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटाचे शूटींग सुरू असून दिलजीत दोसन्ज, मनोज बाजपेयी, नेहा पेंडसे, सुप्रिया पिळगावकर आणि फातिमा सना शेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details