महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

फॅशन डिझायनर स्वप्निल शिंदे 'झाली' सौंदर्यवती 'ट्रान्सवुमन' - स्वप्निल शिंदे ट्रान्सवुमन म्हणून बाहेर आली आहे

लोकप्रिय फॅशन डिझायनर स्वप्निल शिंदे ट्रान्सवुमन म्हणून बाहेर आली आहे. फॅशन डिझायनरने सोशल मिडियावर ही घोषणा केली आहे की तो आता 'ती' म्हणून नवीन प्रवास सुरू करत आहे. तिचा नवीन वर्षातील सुंदर स्त्री लूक इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Swapnil Shinde comes out as transwoman
स्वप्निल शिंदे बनली 'ट्रान्सवुमन'

By

Published : Jan 6, 2021, 6:50 PM IST

Updated : Jan 6, 2021, 7:14 PM IST

मुंबई - सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर स्वप्निल शिंदे याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या लिंगाबद्दल मोठी घोषणा केली आहे. शिंदे याने इन्स्टाग्रामवर हा खुलासा केला की तो 'गे' पुरुष नाही तर ट्रान्सवुमन आहे. त्याने सायशा हे आपले नवीन नावही निवडले आहे. इन्स्टाग्रामवर तिने आपली स्वप्निल शिंदे हे नाव बदलून सायशा असे ठेवले असून तिचा नवीन वर्षातील सुंदर स्त्री लूकही शेअर केला आहे.

स्वप्निल शिंदे 'झाली' सौंदर्यवती 'ट्रान्सवुमन'

दिग्गज अभिनेत्रींचा स्वप्निल होता फॅशन डिझायनर

शिंदेने बॉलिवूडच्या सर्व ए-लिस्टरबरोबर काम केले आहे. दीपिका पादुकोण, कियारा अडवाणी, करीना कपूर खान, माधुरी दीक्षित-नेने आणि सनी लिओनी सारख्या बर्‍याच दिग्गज अभिनेत्रींना त्याने आपल्या कलाकृतींनी सजवले आहे.

स्वप्निल बनला सायशा

मंगळवारी शिंदे यांनी सोशल मीडियावर आपण ट्रान्सवुमन म्हणून बाहेर येत असल्याची घोषणा केली आणि सायशा शिंदे अशी आपली एक नवी ओळख असल्याचा खुलासा केला. "सायशा म्हणजे अर्थपूर्ण जीवन आणि मी माझे जीवन एक अपवादात्मक अर्थपूर्ण बनवण्याची योजना आखत आहे," असं तिच्या इंस्टाग्राम पोस्टवर कॅप्शन म्हणून तिने लिहिलं आहे.

पोस्टमध्ये तिने पुढे लिहिले आहे की, "आपल्या उत्पत्तीची पर्वा न करता, नेहमीच आपल्या बालपणीची आठवण करून देणाऱ्या काहीतरी गोष्टी असतात. यातून मी एकटेपणाकडे ढकलले गेले, दबाव वाढला आणि प्रत्येक क्षणी संभ्रमाच्या अराजकतेकडे गेले."

स्वप्निल शिंदे 'झाली' सौंदर्यवती 'ट्रान्सवुमन'

शालेय काळात जगणे बनले होते मुश्किल

तिने पुढे लिहिले, "शाळा व महाविद्यालयीन काळात सर्वच बाहेरील मुलांनी मला त्रास दिला कारण मी वेगळी होते, मनातील वेदना खूपच वाईट होती. दररोज सामाजिक अपेक्षा आणि निकषांमुळे मला माहित नसलेले असे जबरदस्तीने जीवन जगणे मला धक्कादायक वाटले. शतकाच्या सुरुवातीसच मला माझे सत्य स्वीकारण्याचे धैर्य मिळाले; मी खरोखरच बहरल आहे. "

सायशाने ही महत्वाची घोषणा केली की, "मी समलिंगी असल्यामुळे पुरुषांकडे आकर्षित होतेय यावर विश्वास ठेवून मी पुढची काही वर्षे घालवली, परंतु फक्त ६ वर्षांपूर्वी मी शेवटी स्वतःला स्विकारले, आणि आज मी तुम्हाला स्वीकारते. मी समलिंगी व्यक्ती नाही. मी ट्रान्सवुमन आहे. "

हेही वाचा -टायगर श्रॉफने शेअर केली 'कॅसानोवा' गाण्याची पहिली झलक

या घोषणेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना अनेक सेलिब्रिटींनी तिच्या या धाडसी निर्णयाचे कौतुक केले आहे आणि तिला प्रोत्साहन देण्यासाठी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा -तापसी पन्नूच्या 'रश्मी रॉकेट' सिनेमाच्या शूटिंगची गुजरातमध्ये तयारी

Last Updated : Jan 6, 2021, 7:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details