मुंबई - कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर गेली ३९ दिवस धरणे देऊन बसले आहेत. मात्र अद्यापही या शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही. इतरवेळा छोट्या छोट्या गोष्टींसाठी ट्विटर वापरणाऱ्या सेलेब्रिटींना यावर चकार शब्द काढलेला नाही. या आंदोलनाबद्दल त्यांना काय वाटते हे जाणून घेण्यासाठी काही शेतकरी दिल्लीहून मुंबई आले आहेत. त्यांना अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, अनुपम खेर आणि कंगना रणौत यांची भेट घ्यायची आहे.
सेलेब्रिटींना भेटण्यासाठी त्यांनी मुंबई पोलिसांना निवेदन दिले असून या लोकांची भेट घेतल्या शिवाय परत जाणार नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते मोहित शर्मा यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.