मुंबई - मुंबईतील ड्राईव्ह-थ्रू सेंटरमध्ये कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला डोस कसा मिळाला हे सांगून अभिनेता फरहान अख्तरने ट्रोलर्सच्या टीकेला उत्तर दिले आहे.
८ मे रोजी फरहानने ट्विटरवर मुंबईतील अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ड्रायव्ह-थ्रूद्वारे कोविड लसीचा पहिला डोस घेतल्याचे शेअर केले होते. त्यानंतर ट्रोलर्सनी त्याच्यावर टीका करायला सुरूवात केली. ड्राइव्ह-इनमध्ये वृध्दांसाठी लसीकरणसुरू असताना फरहानला लस कशी देण्यात आली अशी टीका सुरू झाली होती.
ड्राइव्ह-इनमध्ये ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जात असताना ४७ वय असलेल्या फरहान अख्तरला लस कशी मिळाली असा दावा नेटिझन्सनी केल्यानंतर त्याने खुलासा करण्याची मागणी करण्यात येत होती. फरहानला प्रश्न विचारत एका युजरने लिहिले, ''आणखी एक सेलेब्रिटीने ६० वर्षावरील नागरिकांसाठी राखीव असलेल्या ड्राईव्ह इनमध्ये लस घेतली. जर तो ६० वर्षावरील असेल तर ते आम्हाला माहिती नाही. किंवा त्याने आपले वजन वापरून लस घेतली असेल.''