महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Farhan-Shibani wedding: धर्मनिरपेक्ष राहून फरहान आणि शिबानी करणार संसार - फरहान शिबानी मराठी लग्न

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांचा विवाहपूर्व सोहळा उत्सवात सुरू झाला आहे. अनेक रिपोर्टनुसार हे जोडपे निकाह वाचतील आणि मराठी रितीरिवाजांनुसार लग्न करतील. दोघांनी एकमेकांची धार्मिक पार्श्वभूमी आणि श्रद्धा त्यांच्या खास दिवसापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

फरहान आणि शिबानी
फरहान आणि शिबानी

By

Published : Feb 18, 2022, 1:22 PM IST

मुंबई -बॉलीवूड अभिनेता-निर्माता फरहान अख्तर त्याची प्रेयसी शिबानी दांडेकरसोबत 19 फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकणार आहे. हे जोडपे जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत खास दिवशी लग्नाच्या शपथेची देवाणघेवाण करणार आहेत.

फरहान आणि शिबानी यांच्या लग्नाआधीच्या उत्सवाला गुरुवारी मुंबईत सुरुवात झाली. या दोघांच्या लग्नाआधीच्या उत्सवातील फोटो इंटरनेटवर फिरत आहेत. फरहानची सावत्र आई शबाना आझमी, शिबानीच्या बहिणी अनुषा आणि अपेक्षा दांडेकर, जवळच्या मैत्रिणी रिया चक्रवर्ती आणि अमृता अरोरा फरहानच्या मुंबईतील घरी इतर पाहुण्यांसोबत दिसत आहेत.

दरम्यान, अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की हे जोडपे निकाह वाचतील आणि मराठी रितीरिवाजांनुसार लग्न करतील. फरहान आणि शिबानीने एकमेकांची धार्मिक पार्श्वभूमी आणि श्रद्धा त्यांच्या खास दिवसापासून दूर ठेवण्यासाठी पारंपारिक लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. धर्मनिरपेक्ष राहून संसार करण्याचा निर्णय जोडप्याने घेतला आहे.

गेल्या काही दिवसांपासून डेट करत असलेले फरहान आणि शिबानी 21 फेब्रुवारीला मुंबईत त्यांच्या लग्नाची नोंदणी करणार आहेत. वृत्तानुसार, शनिवारी 19 फेब्रुवारीला जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या खंडाळा फार्महाऊसवर लग्नसोहळा पार पडणार आहे. जवळपास 50 पाहुणे लग्नाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -पाहा, 'गहराइयाँ' स्टार्सचे पाण्याखालील लक्षवेधी फोटो!!

ABOUT THE AUTHOR

...view details