मुंबई- अभिनेता फरहान अख्तर सध्या चित्रपटांपेक्षाही शिबानी दांडेकरसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून हे कपल अनेकदा एकत्र स्पॉट केलं जात आहे. फरहान दोघांचे फोटोही अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असतो. अशात आता फरहानचा आणखी एक फोटो चर्चेत आला आहे.
ओळखा पाहू, हा अभिनेता कोण? शेअर केला बालपणीचा फोटो - sky is pink
गेल्या काही महिन्यांपासून हे कपल अनेकदा एकत्र स्पॉट केलं जात आहे. दोघांचे फोटोही अनेकदा सोशल मीडियावर पाहायला मिळतात.
![ओळखा पाहू, हा अभिनेता कोण? शेअर केला बालपणीचा फोटो](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3650015-thumbnail-3x2-img.jpg)
हा फोटो आहे फरहानच्या बालपणीचा. शेअर केलेल्या या फोटोत फरहानशिवाय त्याची बहीण जोया अख्तर आणि चुलत भाऊ निशांत अन् कबीर हेदेखील दिसत आहेत. वाईड अँगल कॅमेरा लेन्स नव्हते त्याकाळातला हा फोटो, असे कॅप्शन देत फरहानने हा फोटो शेअर केला आहे.
चित्रपटांविषयी बोलायचं झालं तर फरहान सध्या ‘स्काय इज पिंक’ चित्रपटात व्यग्र आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री प्रियांका चोप्रादेखील झळकणार आहे. सोनाली बोसद्वारा दिग्दर्शित ‘स्काय इज पिंक’ हा चित्रपट येत्या ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.