मुंबई- बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर हा आगामी 'तुफान' चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट एका बॉक्सरच्या जीवनावर आधारित असून हा कोणाचाही बायोपिक नसला, तरीही या चित्रपटातून बॉक्सरची कथा पडद्यावर पाहायला मिळणार आहे. आता फरहाननं या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे.
फरहाननं केली 'तुफान'च्या चित्रीकरणाला सुरुवात, फोटो केला शेअर - ओमप्रकाश मेहरा
या चित्रपटातून बॉक्सरची कथा पडद्यावर पाहायला मिळणार आहे. आता फरहाननं या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. आपल्या इन्स्टाग्रामवरुन फोटो शेअर करत त्यानं चित्रपटाच्या चित्रीकरणाचा आज पहिला दिवस असल्याचे सांगितले आहे.
आपल्या इन्स्टाग्रामवरुन फोटो शेअर करत त्यानं चित्रपटाच्या चित्रीकरणाचा आज पहिला दिवस असल्याचे सांगितले आहे. फरहान गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमासाठी प्रशिक्षण घेत होता. या चित्रपटासाठी मेहनत घेतानाचे त्याचे अनेक व्हिडिओही तो आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असतं, त्यामुळं फरहानचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
अभिनेते परेश रावल या सिनेमात फरहानच्या प्रशिक्षकाची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक ओमप्रकाश मेहरा यांच्यासोबत तब्बल ७ वर्षानंतर फरहान एकत्र काम करत आहे. त्यांच्या 'भाग मिल्खा भाग' चित्रपटात फरहानने भूमिका साकारली होती.