मुंबई- अभिनेता फरहान अख्तर आणि चित्रपट निर्माता राकेश ओमप्रकाश मेहरा पुन्हा एकदा सोबत काम करणार आहेत. भाग मिल्खा भाग पाठोपाठ आता हे दोघंही 'तूफान' चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. फरहानने काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाविषयीची घोषणा केली होती. या चित्रपटात एका बॉक्सरची कथा पाहायला मिळणार आहे.
'तूफान' चित्रपटासाठी फरहान अख्तर करतोय बॉक्सिंगची तयारी, व्हिडिओ केला शेअर - upcoming movie
फरहानने आतापासूनच या चित्रपटासाठी तयारीला सुरूवात केली आहे. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात फरहान संपूर्ण एनर्जीसोबत बॉक्सिंग करताना दिसत आहे.
फरहानने आतापासूनच या चित्रपटासाठी तयारीला सुरूवात केली आहे. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात फरहान संपूर्ण एनर्जीसोबत बॉक्सिंग करताना दिसत आहे. 'ही फक्त ताकद नव्हे तर वेगाचीही गोष्ट आहे', असे कॅप्शन फरहानने या व्हिडिओला दिलं आहे.
तर चित्रपटाचे चित्रीकरण या वर्षाच्या शेवटी सुरू होईल, असे निर्माता ओमप्रकाश यांनी म्हटले आहे. या चिपटाची कथा अंजुम साजाबलींने लिहिली असून ती एका बॉक्सरची लव्हस्टोरी असणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित असणार आहे.