मुंबई- चित्रपट निर्माती-नृत्यदिग्दर्शिका फराह खान कुंदर हिची कोरोनाची टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. यातून ती लवकर बरी होईल अशी अपेक्षा आहे. मैं हूं ना, ओम शांती ओम आणि हॅपी न्यू इयर सारख्या चित्रपटांची दिग्दर्शिका असलेल्या फराहने कोविडचे दोन्ही लसीचे डोस घेतले होते.
"दुहेरी लसीकरण केलेले असताना आणि दुहेरी लस घेतलेल्या बहुतेक लोकांसोबतच काम करीत असताना माझी कोविड टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. मी संपर्कात असलेल्या सर्वांना कोरोनाची टेस्ट घेण्यास सांगितले आहे," असे 56 वर्षीय दिग्दर्शिका फराह खानने इन्स्टाग्रामवर लिहिले आहे.