मुंबई - स्पाइनल मस्क्युलर एट्रोफी (एसएमए) नावाच्या दुर्मिळ आनुवंशिक विकाराने ग्रस्त असलेल्या मदतीसाठी सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फराह खान पुठे आल्या आहेत. त्याच्या इलाजासाठी आवश्यक 16 कोटी रुपयांची मदत त्यांनी उभारली आहे. या आजाराने हरियाणातील रहिवासी प्रवीण मदन यांचा मुलगा अयांशच्या घशाचे आणि फुफ्फुसांचे स्नायू इतके कमकुवत झाले आहेत की तो बोलू शकत नाही, श्वास घेऊ शकत नाही किंवा काहीही गिळू शकत नाही.
आयंश या मुलासाठी आवश्यक आहे 16 कोटीचे इंजेक्शन
गुरूग्रामच्या या निष्पाप आयंश या मुलावर उपचार होण्यासाठी आवश्यक आहे झोलगेन्स्मा हे जगातील सर्वात महागडे औषध. फराह खान यांनी यासाठी मोठे योगदान दिले आहे. फराह खान आणि दीपिका पदुकोण कौन बनेगा करोडपती शोमध्ये गेस्ट म्हणून आल्या होत्या . त्यावेळी ही रक्कम जिंकल्यानंतर याचा उपयोग कसा करणार असा प्रश्न अमिताभ बच्चन यांनी फराह यांना विचारला होता. त्यावेळी अयांश या मुलाच्या आजाराची व्यथा फराह यांनी सांगितली व या स्पाइनल मस्क्युलर एट्रोफी (एसएमए)च्या इलाजासाठी आवश्यक 16 कोटी रक्कम उभी करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्यावेळी अमिताभ यांनीही आपण यासाठी मदत करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर फराह यांनी आपल्या सोशल मीडियावरुन लोकांना मदतीचे आवाहन केले होते.
फराह खान यांनी उभी केली 16 कोटींची मदत