महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'मन्नत'बंगल्याबाहेर फॅनची शाहरुख स्टाईलमध्ये एन्ट्री - फॅनची शाहरुख स्टाईलमध्ये एन्ट्री

शाहरुख खानचा काल 56 वा वाढदिवस पार पडला. त्याला शुभेच्छा देम्यासाठी मन्नत बंगल्याच्या बाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. मात्र त्याचीएक झलक पाहण्याची चाहत्यांची मन्नत काही पूर्ण होऊ शकली नाही. दरम्यान एका चाहत्याने कमाल केली. शाहरुखचा वेश धारण करुन तो चाहत्यांसमोर आल्याने आनंदाला उधान आले. काही वेळानंतर तो खरा शाहरुख नसल्याचे कळले, मात्र काही क्षण का असेना लोकांनी मात्र आनंद लुटला.

शाहरुख खानचा वाढदिवस
शाहरुख खानचा वाढदिवस

By

Published : Nov 3, 2021, 4:04 PM IST

मुंबई- सुपरस्टार शाहरुख खानचा काल 56 वा वाढदिवस पार पडला. त्याला शुभेच्छा देम्यासाठी मन्नत बंगल्याच्या बाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. मात्र त्याचीएक झलक पाहण्याची चाहत्यांची मन्नत काही पूर्ण होऊ शकली नाही. दरम्यान एका चाहत्याने कमाल केली. शाहरुखचा वेश धारण करुन तो चाहत्यांसमोर आल्याने आनंदाला उधान आले. काही वेळानंतर तो खरा शाहरुख नसल्याचे कळले, मात्र काही क्षण का असेना लोकांनी मात्र आनंद लुटला.

बाप म्हणून शाहरुखची काळजी

दरवर्षी शाहरुखच्या वाढदिवशी 2 नोव्हेंबरला मन्नत बंगल्याच्या बाहेर मोठी गर्दी होते. त्यांना भेटण्यासाठी शाहरुख बाल्कनीत येतो आणि सर्वांना अभिवादन करतो. ही अनेक वर्षांची परंपरा काल खंडीत झाली. शाहरुखचा मुलगा आर्यन खानला अलिकडेच ड्रग प्रकरणात अटक झाली होती. त्यानंतर मन्नतवर शांतता पाहायला मिळाली. ज्या घरात नेहमी आनंदाचे, उत्साहाचे वातावरण असते त्या मन्नतची जागा काळजीने घेतली होती. अखेर 28 ऑक्टोबरला 26 दिवसांचा तुरुंगवास भोगून आर्यन परतला. अद्यापही हे प्रकरण संपलेले नाही. त्यामुळे एक बाप म्हणून शाहरुख काळजीत आहे. त्यामुळे यंदाच्या वाढदिवसाला तो सेलेब्रिशनपासून दूरच राहिला.

मन्नत बंगल्याच्या बाहेर पोलिसही चक्रावले

शाहरुख सेलेब्रिशन करणार नव्हता ही बाब चाहत्यांना कशी कळणार. त्यांनी धुमधडाक्यात तयारी केली होती. केवळ मुंबईच नाही तर देशभरातील चाहते मन्नत बंगल्याच्या बाहेर 2 नोव्हेंबरला दाखल झाले होते. पण गेली 3-4 आठवडे आर्यनमुळे चिंतेत असलेल्या शाहरुखला वाढदिवस साजरा करणे प्रशस्त वाटले नाही. फॅन्स मात्र बंगल्याच्या बाहेर प्रतीक्षा करीत राहिले. वाढत्या गर्दीला रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. अशा या तणावाच्या स्थितीत एका चाहत्याने सनरूफ असलेल्या कारमधून शाहरुखच्या वेशात एन्ट्री केली आणि टाळ्या शिट्यांनी परिसर दुमदुमून गेला. मास्क घातल्यामुळे तो खरोखर शाहरुख खान आहे का, हे तिथे उपस्थित पोलिसांनाही काही काळ समजू शकले नाही.

शाहरुख पुनरागमनासाठी सज्ज

शाहरुख खान काही आठवड्यापूर्वी दीपिका पदुकोणसोबत पठाण चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होता. मात्र आर्यन खानला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात पकडल्यानंतर शाहरुखने काही काळ शूटिंगमधून ब्रेक घेतला. आता शाहरुख लवकरच चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्यासाठी पठाणच्या टीममध्ये सामील होणार आहे. झिरो या चित्रपटानंतर शाहरुखचे हे पुनरागमन असेल.

हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष : हरवत चाललेली 'ती' दिपावली..

ABOUT THE AUTHOR

...view details