महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

जगभरातील फॅन्सनी साजरा केला एसआरकेचा व्हर्च्युअल वाढदिवस - King of Bollywood Shah Rukh Khan

शाहरुखने आज आपला ५५वा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा केला आहे. दरवर्षी तो आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करतो, पण यावर्षी शाहरुख खान आपल्या चाहत्यांना व्हर्च्युअली भेट देऊन शुभेच्छा स्वीकारल्या. जगातील फॅन्सनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Shah Rukh's virtual birthday
शाहरुखचा व्हर्चुअल वाढदिवस

By

Published : Nov 2, 2020, 1:06 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा किंग शाहरुख खान सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. शाहरुख आज आपला ५५वा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा करीत आहे. दरवर्षी तो आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करतो, पण यावर्षी एसआरके आपल्या चाहत्यांना भेटू शकणार नाही. दरवर्षी हजारो चाहते त्यांच्या बंगल्याबाहेर थांबतात, पण यावर्षी ते कोरोनामुळे शक्य झालेले नाही.

असे असले तरी, शाहरुख यावर्षी चाहत्यांना निराश होऊ देणार नाही. यावर्षी त्याने आपल्या चाहत्यांसाठी काही योजना तयार केल्या आहेत. किंग खान यावर्षी आपला वाढदिवस व्हर्च्युअल पद्धतीने (ऑनलाइन) साजरा करणार आहे. कोरोनामुळे शाहरुखने आपल्या चाहत्यांना याबाबत विनंती केली आहे. त्यांने लिहिले आहे की, यावेळी प्रेम थोडे दूरुनच करा. शाहरुख खान फॅन क्लबच्या एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी तो आपला वाढदिवस व्हर्च्युअल पद्धतीने साजरा करणार आहे. कोरोना असतानाही शाहरुखचा वाढदिवस भव्य साजरा करण्याची तयारी त्याच्या फॅन क्लबने केली आहे.

शाहरुखच्या वाढदिवसची व्हर्च्युअल पार्टी काही वेळापूर्वी पार पडली. जगभरातील ५००० फॅन्स यात सामिल झाले होते. मात्र तांत्रिक कारणाने यात काही अडथळे आले होते. याबद्दल फॅन क्लबने आपल्या सदस्यांचे आणि तमाम चाहत्यांची माफी मागितली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details