मुंबई - हृतिक रोशनसोबतच्या तिच्या जुन्या नात्यावर ट्वीट केल्याबद्दल कंगना रनौत हिला ह्रतिकच्या चाहत्यांच्या टीकेचा सामना करावा लागला. याचा परिणाम असा झाला, की दिवसभर हृतिक ट्विटरवर ट्रेंड करत राहिला. आदल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी कंगनाने दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि सारा अली खान यांच्यातील संबंधांबद्दलचे ट्विट केले होते.
कंगनाने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “सर्व माध्यमात एसएसआर आणि साराच्या अफेअरच्या बातम्या आल्या होत्या, ते उघडपणे ते बाहेरही एक रुम शेअर करीत होते. फॅन्सी नेपोटिझ्मची ही मुले का कमजोर बाहेरच्या लोकांना स्वप्ने दाखवतात आणि मग ती जाहीरपणे फसवणूक का करतात? यानंतर तर उघड आहे की, सुशांत एका गिधाडाच्या ताब्यात सापडला होता.''
तिच्या ट्वीटवरून युजर्सना समजले की, 'फॅन्सी नेपोटिझम किड' हे शब्द सारा अली खानच्या संदर्भात आहेत आणि 'गिधाड' म्हणत ती सुशांतची मैत्रीण असलेल्या रिया चक्रवर्तीचा उल्लेख करत आहे.
ट्विटवर भाष्य करताना एका युजरने लिहिले की, “केदारनाथ” च्या प्रमोशनच्या काळापासून मी असे म्हणत आलोय की हे दोघे एकमेकांच्या प्रेमात वेड्यात आहेत, पण कोणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. जेव्हा साराने त्याला अचानक सोडले तेव्हा सुशांतने तिला अनफॉलो करीत आपल्या इन्स्टाग्रामवरुन डिलीट केले. या वाक्याने तो खूप प्रभावित झाला होता."