महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'केदारनाथ' पुन्हा रिलीज होत असल्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी - Fans oppose Kedarnath's release

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा 'केदारनाथ' हा चित्रपट पुन्हा मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. परंतु ही गोष्ट त्याच्या चाहत्यांना पटलेली नाही. सुशांतच्या नावाने पैसे मिळवण्यासाठीचा हा धंदा असल्याच्या प्रतिक्रिया त्यांनी दिल्यात.

'Kedarnath
'केदारनाथ

By

Published : Oct 15, 2020, 5:21 PM IST

मुंबई - अनलॉक -5 अंतर्गत 15 ऑक्टोबरपासून थिएटर सुरू झाल्यामुळे दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा 'केदारनाथ' हा चित्रपट पुन्हा मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. तथापि, बरेच चाहते याबद्दल नाराज आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होत असून नफा मिळवण्याच्या हेतुने प्रदर्शित होत असल्याचे त्यांच्या चाहत्यांना वाटते.

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटरवरुन 'केदारनाथ' चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये रिलीज होत असल्याचे सांगितले होते.

यावर सुशांतच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक युजर म्हणतो, ''सुशांतसिंहच्या निधनानंतर लोभी निर्माता सुशांतच्या नावाने पैसे कमवू पाहात आहे. पैसे कमवायचा चांगला धंदा आहे पण आम्ही काही मुर्ख नाही आहोत.''

दुसऱ्या एका युजरने लिहिलंय, "जेव्हा सुशांत जिवंत होता तेव्हा केदारनाथ चित्रपटालाच स्क्रीन ते देत नव्हते आणि आता पुन्हा प्रदर्शित होण्यात काहीच अर्थ नाही. सुशांतला याचा काय फायदा होईल? आत्महत्या असो की हत्या, बॉलिवूडने त्याच्याशी वाईट वागणूक दिली आहे. "

एका वापरकर्त्याने असेही लिहिले आहे की, "थिएटरमध्ये जाऊ नका, केदारनाथलाही जाऊ नका, कारण त्याचा फायदा सुशांतला होणार नाही. हो, त्याच्या खुन्यांना याचा फायदा होईल.''

ABOUT THE AUTHOR

...view details