मुंबई: रॅपर बादशाहच्या गाण्याला लाखो-करोडो लोक फॉलो करतात. मात्र, यातील अनेक फॉलोअर्स फेक असल्याचे मुंबई पोलिसांच्या गुन्हा शाखेला वाटते. याची चौकशी करण्यासाठी त्याला ७ ऑगस्ट रोजी बोलवण्यात आले होते. ६ तारखेला त्याला समन्स मिळाले होते. माहितीनुसार, गुन्हे शाखेने बादशाहसाठी २88 प्रश्नांची यादी तयार केली आहे.
तो गुरुवारीही तपास अधिकाऱ्यांसमोर हजर झाला. आतापर्यंत एकूण 20 जणांना गुन्हे शाखेने प्रश्न विचारले आहेत. रॅपर बादशाहने यावेळी बॅगी ब्लू शर्ट आणि ब्लॅक लोअर घालून आला होता. कोरोना व्हायरसच्या भीतीने त्याने त्याच्या चेहऱ्यावर मास्क लावला होता.
बादशाहकडून गुन्हे शाखेला हे समजून घ्यायचे आहे की, सोशल मीडियावर त्याच्या गाण्याला कोट्यवधी लोकांच्या लाईक मिलाल्या आहेत. परंतु इतकी मोठी संख्या असताना केवळ शेकडो लोकांनीच त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. उदाहरणार्थ, त्याच्या पागल है या गाण्याला एका दिवसा ७५ दशलक्ष व्यूव्ह्ज मिळाले, मात्र गुगलने हा दावा फेटाळून लावला आहे. बादशाहने केलेल्या या दाव्याची पडताळणी गुन्हे शाखेला करायची आहे.