मुंबई- गंगूबाई काठियावाडी ( Gangubai Kathiawadi ) या सिनेमातून संजय लीला भन्साळी ( ( Sanjay Leela Bhansali ) आणि आलिया भट्ट ( Alia Bhatt ) धमाका करण्यासाठी सज्ज झाले आहेत. रिलीजची तारीख जाहीर केल्यानंतर निर्मात्यांनी आता सिनेमाचा ट्रेलर ( Gangubai Kathiawadi Trailer ) प्रदर्शित केला आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षकांना सिनेमा हॉलकडे आकर्षित करण्यासाठी पुरेसे आश्वासन मिळालेले दिसत आहे.
चित्रपट निर्माता संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'गंगूबाई काठियावाडी' हा बहुप्रतीक्षित चित्रपट 25 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
संजय लीला भन्साळींनीच या चित्रपटाची कथा लिहिली आहे. तसेच, त्यांच्या निर्मितीखाली आणि दिग्दर्शनाखाली हा चित्रपट तयार आहे. अजय देवगण यांचीही यामध्ये महत्त्वाची भूमिका राहणार असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे. तर, विजय राज, सीमा पाहवा आणि इंदिरा तिवारी यांच्या भूमिकेची झलक पाहायला मिळते. 72 व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर होणार आहे.